कोल्हापूर / प्रतिनिधी
हॉकी स्टेडियम येथील एका बंगल्याचे वॉटर प्रूफिंगचे काम करताना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात युवक जखमी झाला. स्वरूप संदीप घोरपडे (वय १८, रा. पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. स्वरूप याच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

