इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील मारवल ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वुमन आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व युवतींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वर्षी निर्भया पथक प्रमुख व पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांचेसह मर्दानी खेळाच्या प्रशिक्षिका केतकी रेंदाळे, प्राथमिक शिक्षिका रमिला तराळ, माध्यमिक शिक्षिका सरिता ठाणेकर, कलाक्षेत्रातील सुचिता तारळेकर, ब्युटीशियन वैशाली निकम व फॅशन डिझायनर सुषमा करण्यात आली. पुरस्कार वितरण यशवंत मंगल कार्यालय, मारवल स्कूल जवळ, इचलकरंजी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नंदराज पवार, संस्थेच्या सचिव शुभांगी पवार, विश्वस्त तेजस पवार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
