हिवाळी सत्र परीक्षा १२ नोव्हेंबरपासून

कोल्हापूर /प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर २०२४ हिवाळी सत्रातील परीक्षांना १२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी परीक्षेच्या सुधारित तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये डिप्लोमा, पी. जी. डिप्लोमा, सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी हे इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. १२ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. तर कला, वाणिज्य, विज्ञान पांरपरिक अभ्यासक्रमाच्या पदवी स्तरावरील परीक्षांना दि. २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ

करण्यात येत आहेत. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान पांरपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ४ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांचे, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

Scroll to Top