जिल्ह्यात रविवारी दिवसभर व्हॉट्सअप ग्रप हॅक करुन त्यावर महिलांचे अस्लील फोटो आणि व्हीडीओ हॅकर्सकडून व्हायरल होवू लागल्याने ॲडमिनसह ग्रुप मेंबरांची झोप उडाली. सर्वसाधारणपणे सकाळी ११ वाजल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप ऑल क्लिअर करण्यासाठी ग्रुप ॲडमीनचे फोन खणखणू लागले. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळपासून काही लोकांचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक करुन ग्रुपवर एक लिंक टाकण्यात आली होती. ही लींक काय आहे. पाहण्यासाठी ग्रुप मेंबरनी लिंक उघडल्यावर काही आक्षेपार्ह मेसेज अस्लील व्हिडिओ फोटो ग्रुपवर पडत होते. एका पाठोपाठ व्हीडीओ, फोटो दणादण पडू लागल्याने अनेकांना मनस्ताप झाला. हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.