माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

हातकणंगले/ प्रतिनिधी

2025 – 26 या शैक्षणिक वर्षाला सर्व शाळांमध्ये उत्साहात सुरूवात झाली. माध्यमिक विद्यालय हातकणंगले या प्रशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना इंगवले म्हणाले की ” विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बाबतीत प्रगत व अद्यावत असले पाहिजे, सोबतच पालकांनी शिक्षणाच्या बाबत सजग असणे गरजेचे आहे. भविष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते.

Scroll to Top