भारत गौरव पर्यटन ट्रेनचे कोल्हापूरात स्वागत

कोल्हापूर / प्रतिनिधी

रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर’ हा विशेष उपक्रम सुरू झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारसाला मानवंदना देणारा डी हा उपक्रम पर्यटकांना त्यांच्या ८. जीवनाशी निगडित किल्ले आणि -, धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास ग देणारा आहे. या योजनेअंतर्गत पहिली ट्रेन ९ जून २०२५ (शिवराज्याभिषेक दिन) रोजी मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटली. ही ट्रेन कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाची ओळख व्हावी यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने ही विशेष सहल आयोजित केली आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात पर्यटकांना रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यासह निवडक धार्मिक स्थळांना भेटीची संधी मिळाली आहे.

Scroll to Top