कोल्हापूर / प्रतिनिधी
मागील महिन्यात कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टाफसाठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे वॉटर प्युरिफायर बसविण्याची मागणी केली होती.
त्यानुसार कोल्हापूर चेंबर मार्फत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्याकडे आरओ वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या जनसामान्यांची गरज ओळखून सामाजीक कार्याच्या उद्देशाने चेंबरतर्फे आरओ वॉटर प्युरिफायर प्रदान करत आहोत असे सांगितले. तसेच व्यापारी-उद्योजकांच्या असणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती कण्हेरकर यांना केली. पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी चेंबरने केलेल्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच लक्ष्मीपुरी हद्दीत असणाऱ्या व्यापारी-उद्योजकांचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, आनंद माने, मानद सचिव जयेश ओसवाल, अजित कोठारी, खजिनदार राहुल नष्टे, संचालक प्रशांत पोकळे, सुजित चव्हाण, रमेश लालवाणी, रमेश कारवेकर, राहुल मेंच, अनिल धडाम उपस्थित होते.

