परिवहन कार्यालयामार्फत मतदान टक्का वाढविण्यासाठी शपथ

हुपरी/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत येथील वाहनचालकांसाठी घेतलेल्या परवाना मेळाव्यात वाहनधारकांना आज मतदाना संदर्भात शपथ देण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक संदीप गडकर यांनी शपथ दिली.

प्रत्येक महिन्याच्या दुसन्या, तिसऱ्या आणि चौथ्या बुधवारी येथे परवाना मेळावा होतो. परवान्यासाठी शेकडो बाहनधारक या मेळाव्यात येतात. तरुणांसह एकूणच नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून वाहनधारकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

‘आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,’ अशी प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. यावेळी सहाय्यक निरीक्षक प्रवीण सातारे ‘ वाहन निरीक्षक पृथ्वीराज गायकवाड उपस्थित होते.

Scroll to Top