आंबा / प्रतिनिधी
पर्यटक व विशाळगडवासीयांच्या मागणीनुसार उरुसापासून दि.११ ते ३१ जानेवारी अखेर गड सर्वांना खुला राहील असे महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त आदेशाने जाहीर केले होते. आज पुन्हा नव्या आदेशाने विशाळगड पर्यटक व भाविकांना खुला राहील असे शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सकाळी दहा ते पाच याऐवजी सकाळी नऊ ते पाच असे एक तास वेळ वाढवून गड खुला करण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल विशाळगडवासीयांनी प्रशासनाचे स्वागत केले आहे. भाविकातूनही समाधान व्यक्त होत आहे.