विधानसभा 2024 ची तारीख जाहीर, या दिवशी असेल मतदान 

विशेष प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात यंदा फक्त एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होईल तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागतील.

29 ऑक्टोबर ही निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही निवडणूक अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे.

 

Scroll to Top