रमेश कदम ॲकॅडमीची विजयी सलामी

कोल्हापूर / प्रतिनिधी

मंगलमूर्ती ॲकॅडमीचा १८५ धावांनी पराभव करून रमेश कदम ॲकॅडमी संघाने माजी आमदार कै. दिनकरराव यादव चषक ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामीसह आघाडी मिळविली. जिल्हा क्रिकेट असो. आयोजित ही स्पर्धा राजाराम कॉलेज मैदानावर सुरू आहे.
शनिवारी स्पर्धेचे उद्घाटन संभाजीराव यादव यांच्या हस्ते झाले.
यावेळी शीतल भोसले, केदार गयावळ, विजय सोमाणी, कृष्णात धोत्रे, मदन शेळके, रमेश हजारे, जनार्दन यादव, किरण रावण, नितीन पाटील, रहिम खान, ज्योती काटकर, सूरज जाधव, महेश माने, अमोल कांदेकर आदी उपस्थित होते.
प्रथम फलदांजी करताना रमेश कदम ॲकॅडमीने ४६.५ षटकांत सर्वबाद ३२१ धावा केल्या. यात क्षितीज पाटीलने ७६, सूरज रजपूतने नाबाद ६५, वसीम मुल्लाणीने ५९, धैर्यशील पाटीलने ४३, रोहन सावंतने २४ व यतिराज पाटोळेने २० धावा केल्या. मंगलमूर्ती ॲकॅडमीच्या स्मित भाटकरने ३, वैभव नलवडे व सुरेश सातपुते यांनी प्रत्येकी २ विकेटस् घेतल्या. उत्तरादाखल मंगलमूर्तीॲकॅडमीचा संघ २८.४ षटकांत सर्वबाद १३६ धावांत गुंडाळला. त्यांच्या रणजित मानेने ४४, स्मित भाटकरने २० धावा केल्या. रमेश कदम ॲकॅडमीच्या क्षितीज पाटीलने ४, स्वप्निल कदम व आदित्य पिसाळने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Scroll to Top