ॲथलेटिक्स स्पर्धेत व्यंकटेश्वरा स्कूलचे सुयश

कबनूर/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

बाळासाहेब राजाराम माने क्रीडा व शैक्षणिक संस्था, इचलकरंजी संचलित सह्याद्री स्पोर्टस् अकॅडमी आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेत व्यंकटेश्वरा स्कूलच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवला.
अनुक्रमे ५० मी धावणे स्पर्धेत श्लोक सावंत प्रथम, आयुष वासुदेव द्वितीय, १०० मी धावणे स्पर्धेत श्लोक सावंत प्रथम, विराट जाधव व महेंद्र पिष्टे द्वितीय, उंच उडी स्पर्धेत अनया पाटील, मोक्षा पाटील, अर्णव पाटील प्रथम, रिषिका सातपुते, आरोही दुबे, वेदांत गायकवाड द्वितीय, अमरीन खैरादी तृतीय तसेच लंगडी पळती स्पर्धेत मुली व मुले या दोन्ही संघाने द्वितीय क्रमांक मिळवून बाजी मारली.
वरील सर्व क्रीडापटूंना शाळेचे मुख्य कार्यवाह संजय देशपांडे व मुख्याध्यापिका सौ. स्मिता बेडक्याळे यांची प्रेरणा मिळाली. चिफ को-ऑर्डिनेटर्स, को-ऑर्डिनेटर्स, शिक्षकवर्गाने अभिनंदन केले. क्रीडाशिक्षक सुधाकर वायदंडे, अमोल थोरवत, आर. बी. पाटील, सौ. सुजाता निंबाळकर, श्रद्धा चावरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top