वड्डी (ता. मिरज) येथे राजीव गांधीनगर येथे सुलोचना संजय म्हेत्रे (वय 44) या भाजीपाला विक्रेत्या महिलेने सावकारांच्या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन जीवन संपविले. सावकारांच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले असल्याची चिठ्ठी मृतदेहाजवळ सापडली आहे. याबाबत नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसांत खासगी सावकारांविरोधात तक्रार दिली आहे.
सुलोचना यांनी गावातील तीन सावकारांकडून व्याजाने 60 हजार रुपये घेतले होते. त्यांनी व्याजासह पैसे परत केले होते, मात्र आणखी पैशाच्या मागणीसाठी सावकारांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. बुधवारी सकाळी काही खासगी सावकारांनी घरात येऊन त्यांना दमदाटी केली होती. त्यांनतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी घरात छताच्या पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. जीवन संपविण्यापूर्वी त्यांनी रकमेसाठी तगादा लावणार्या तिघा सावकारांची नावे चिठ्ठीत लिहिली आहेत. संबंधित चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

