बुद्धीबळ स्पर्धेत वेदांत बांगड, सांची चौधरी अजिंक्य

इचलकरंजी / प्रतिनिधी

चेस असोसिएशन कोल्हापुरच्या मान्यतेने व रोटरी कलबका इचलकरंजीच्या सहकार्याने चेस असोसिएशन डालकरंजी आयोजित अकरा वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धीबळ स्पर्धा रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, दाते मळा या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत कोल्हापुर, जयसिंगपूर वारणानगर, गडहिंग्लज,इचलकरंजी येथील नामांकित १०३ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात वेदांत बांगडने अजिंक्यपद तर विवान सोनी याने उपविजेतेपद मिळवले. तर तृतीय क्रमांक अवनीश जितकर याने मिळवला. मुलींच्या गटात सांची चौधरी हिने अजिंक्यपद तर थिया शहा हिने उपविजेतेपद मिळवले. कबनूरच्या श्रुती पांडव हिने तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही गटातील विजेते, उपविजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे उ‌द्घाटन माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, प्रमोद सोनी, विशाल कांबळे, कॉ. सदा मलाबादे,संतोष पाटील, चंद्रकांत मगदूम या मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस समारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संचालिका अस्मिता नलावडे, हेमा सलगर,ज्योती हत्तरसंग, शरण सलगर आदी उपस्थित होते.

Scroll to Top