टाकवडेत करवीर यात्रेनिमित्त १२ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम

टाकवडे/प्रतिनिधी

टाकवडे (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री करवीर यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने श्री करवीर देवाची यात्रा १२ ते १५ डिसेंबर अखेर आयोजित केली आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे.

गुरुवार १२ डिसेंबर रोजी स. ७ वा. श्री करवीर देवास अभिषेक व महापुजा, स. ११ वा. अक्कमहादेवी भजनी मंडळ टाकवडे यांचे भजन, शुक्रवारी सायं. ५ वा. खेळ पैठणीचा कार्यक्रम करवीर चौक येथे होणार आहे. यातील विजेत्यांना प्रथम पैठणी, द्वितीय सोन्याची नथ व तृतीय कुकर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री ८.३० वा. करवीर चौक येथे ह.भ.प. काशीद महाराज (कारदगा) यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी स. ८ वा. बिनदाती खोंड शर्यत प्रथम क्रमांक ३००१ व ढाल, द्वितीय २००१ रु. व ढाल, तृतीय १००१ रु. व ढाल देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश फी २०० रुपये असून नांव नोंदणीसाठी ९०२२२९७२४२, ९३०७३०४३५५, ७३८७३२५२१६ या क्रमांकावर संपर्क साधावा. सायं. ६ वा. भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धा होणार असून यासाठी प्रवेश फी ५०० रु. आहेत. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ७००१ रु. व ढाल, व्दितीय ५००१ रु. व ढाल, तृतीय ३००१ रु. व ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी ९०४९१६११३८, ९८५०३४००२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top