रोटरी प्रोबस क्लबमध्ये विविध कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी/ प्रतिनिधी

रोटरी क्लब पुरस्कृत प्रोबस क्लब मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिलांच्या वेगवेगळ्या वेशभूषा करून लक्षवेधी भूमिका साकारल्या.
श्रीमती पुष्पा मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सौ. जयश्री गोंदकर, सौ. विजया स्वामी, श्रीमती रिसवडे यांनी समयोचित भाषणे केली. श्रीमती बाटे यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, श्रीमती लता कळसूर यांनी श्रीमती इंदिरा गांधी, श्रीमती शशिकला गायकवाड यांनी जिजाऊंची वेशभूषा, महादेवी पाटील यांनी राणी येसुबाई, माधुरी शेटे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची व्यक्तीरेखा समर्थपणे उभी केली व भूमिका सादर केली. श्रीमती पोटे यांनी सावित्रीबाई फुले तर श्रीमती सुशीला फाटक यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेविषयी सांगितले. सौ. ठिगळे यांनी सिंधुताई सपकाळ यांची वेशभूषा करून सर्वांना प्रभावित केले. श्रीमती उज्वला गोंधळी यांनी झाशीची राणी, स्नेहा चौगुले यांनी पहिली नर्स फोरेन्स नाइटींगेल यांची वेशभूषा केली. याप्रसंगी महिला डॉ. बडबडे, डॉ. होसकल्ले व डॉ. दरुरे यांचा महिला दिनानिमित्त सत्कार केला. श्रीमती वैशाली नायकवडे व संजय काशीद यांनी अनुक्रमे ताराराणी व गुप्तहेर या भूमिका उठावदारपणे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कमल बिडकर, सौ. मंगल रसाळ, सौ. निर्मला जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती गोरवाडे व श्रीमती मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री कस्तुरे व प्रोग्राम कमिटी चेअरमन रवींद्र सौंदत्तीकर, सदाशिव कदम, रामभाऊ कुडचे यांनी मार्गदर्शन केले. आभार श्रीमती हमीदा गोरवाडे यांनी मानले.

Scroll to Top