वडूज / प्रतिनिधी
माण व खटाव तालुक्यात दळणवळण सुकर करण्यासाठी नेहमीच सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाच्या वडूज आगारासाठी नवीन १० एस.टी. बसेस मंजूर झाले असून त्यापैकी ५ बस उपलब्ध झाल्या आहेत.
माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, वडूजच्या नगराध्यक्षा सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे, उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव आणि वडूजच्या सर्व नगरसेवकांनी तसेच अनेक सामाजिक संघटनांनी वडूज डेपोला नवीन एस. टी. बसेस द्याव्यात, अशी आग्रही मागणी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाकडून वडूज डेपोसाठी नवीन १० गाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी ५ गाड्या वडूज डेपोत दाखल झाल्या आहेत. या नवीन बसेसमुळे माण व खटाव तालुक्यातील प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

