कोल्हापूर / प्रतिनिधी
चहा शौकिनांसाठी खास आनंदाची बातमी आहे. दामोदर शिवराम आणि कंपनीच्या HP गोल्ड चहा या नव्या पॅकेटचे अनावरण अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर हॉटेल पॅवेलियन येथे दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी सुबोध, संदीप, राहुल, तुषार, नीलोत्पल आणि शर्वन गद्रे यांनी उपस्थित राहून नव्या उत्पादनाचे स्वागत केले. हा उंची दर्जाचा HP गोल्ड चहा आता ग्राहकांच्या सेवेत आहे.
दामोदर शिवराम आणि कंपनी ही चहा पेढी १९३० पासून कोल्हापुरातील शाहूपुरी स्टेशन रोडवर कार्यरत आहे. कोकणातील देवरूख येथून या व्यवसायाची सुरुवात झाली असून मुंबई, पुणे, कोलकाता, गुवाहाटीसह देशभरात शाखा विस्तार झाला आहे. गद्रे कुटुंबीयांच्या पाच पिढ्या या व्यवसायात कार्यरत असून २०३० साली या पेढीचे शताब्दी वर्ष साजरे होणार आहे.

