नृसिंहवाडी/ प्रतिनिधी
दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन नृसिंहवाडी नगरी येथे सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना, भक्तांना, रस्त्यावरून चालणे अवघड झाले असून येथील अनेक भाविक ग्रामपंचायत तसेच पोस्ट ऑफिस तसेच मराठी शाळा, बनभाग बी या ठिकाणी अनेक टू व्हीलर वाहने बेशिस्तीपणे लावत असून सर्वसामान्य माणसांना यामधून मी रस्ता शोधून जाण्याची वेळ आलेली आहे.
सध्या शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असुन पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील -, अनेक भक्त येथे येत असून चारचाकी मल्टी लेव्हल नी पार्किंग हाऊसफुल्ल होत आहे. येथे गुरुवारी, शनिवारी बी पौर्णिमेच्या दरम्यान येणारे दत्त भक्त पार्किंग चार्ज चुकवण्यासाठी मंगलम हॉटेल पासून आपली वाहने गावात आणतात आणि बेशिस्तपणे पार्किंग करतात. गुगल मॅप लावून येणाऱ्या भाविकांना येथील लोकेशन औरवाड रस्त्याचे दाखवत असून औरवाड फाट्यावरून चारचाकी वाहने गावात आणतात. ही वाहने गावातून जातात अरुंद गल्लीत लावलेल्या मोटार सायकलमुळे या वाहनांना परत कमानी जवळुन गावात प्रवेश करावा लागतो एखादा गावात अत्यवस्थ रुग्ण असेल तर गावात रुग्णवाहिका आणणे सुध्दा अवघड झाले आहे.
तसेच एखादी आगी सारखी दुर्घटना घडली तर अग्निशामक आणणे अशक्य आहे. या बेशिस्त मोटारसायकल पार्किंग मुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना, भक्तांना या मार्गाने जाणे ही अवघड झाले आहे. नृसिंहवाडी ग्रामपंचायत ने या बाबतीत लक्ष देऊन बेशिस्त मोटारसायकल पार्किंगला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

