उमेश शेंबडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी 

श्री.उमेश विलास शेंबडे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून भौतिकशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त झाली. त्यांनी ”सिन्थेसिस अँड कॅरॅक्टरीझशन ऑफ ग्राफिन ऑक्साईड, टंगस्टन ऑक्साईड अँड देयर कॉम्पोसिट्स युजींग केमिकल मेथड फॉर सुपरकॅपॅसिटर अँप्लिकेशन्स ” या विषयावर पीएच.डी.पदवी मिळवली आहे. यासाठी त्यांना त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, चे भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक शास्त्रज्ञ डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. उमेश यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ३० हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये १० हुन अधिक ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे. त्यांनी शालेय शिक्षण जि.प. शाळा सांगोला व उच्च माध्यमिक-विद्यामंदिर हायस्कुल, एखतपूर तर बी.एस्सी शिक्षण हे सांगोला कॉलेज सांगोला याठिकाणी पूर्ण केले. यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.एस्सी भौतिकशास्त्र या विषयातून शिक्षण पूर्ण केले व पुढे येथूनच आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पीएच.डी काळात त्यांना डॉ. संदीप वाटेगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

याबद्दल बोलताना डॉ.शेंबडे म्हणाले ” सध्या सुपरकॅपसिटर हे क्षेत्र खूप आव्हानात्मक आहे. भविष्यात बॅटरीला पर्याय म्हणून सुपरकॅपॅसिटर वापरला जाऊ शकतो. ऊर्जा साठवण्यासाठी याचा उपयोग केला जातो व याची कार्यक्षमता बॅटरीच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे पीएच.डी साठी या विषयाची निवड केली. माझ्या यशात माझे आई वडील, भैया, वहिनी, आणि पुतणी गौरी, तसेच माझे मार्गदर्शक, मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Scroll to Top