कोल्हापूर / प्रतिनिधी
रुईकर कॉलनी येथील मोकळ्या जागेत लावलेल्या दोन खासगी आराम बसेस जळून खाक झाल्या. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
यापूर्वी याच कंपनीची गोकुळ शिरगाव येथे एक आराम बस जळाली होती. अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत बसेस जळून खाक झाल्या. रुईकर कॉलनी येथील रिकाम्या जागेत बहुतांशी कंपनींच्या खासगी बसेस लावल्या जातात. एका कंपनीच्या बसेस बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी होत्या. यातील एका बसमधून सायंकाळी धूर येऊ लागला. या बसने पेट घेतल्यानंतर बाजूला असणाऱ्या दुसऱ्या बसनेही पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत दोन्ही बसेस खाक झाल्या होत्या.

