ठप्प पोर्ले तर्फ ठाणे / प्रतिनिधी
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ले-केर्लीदरम्यान सोमवारी सायंकाळी सात वाजता जुने वडाचे झाड मोडून रस्त्यावर पडल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी केर्लेचे पोलिसपाटील सचिन भोपळे, महादेव भोसले व स्थानिकांच्या मदतीने प्रारंभी दुचाकी जाण्यासाठी रस्ता करून दिला. त्यानंतर महामार्गाच्या कामावरील जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मोडून पडलेले झाड बाजूला करून दोन तासांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
