जयसिंगपूर /प्रतिनिधी

दोन चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ हा अपघात झाला. श्रीशा सुरेश शिंदे (वय अडीच वर्षे मूळ रा. जांभळे मळा, जयसिंगपूर सध्या रा. सांगली) व बंदेश दशरथ उळागड्डे (वय ५१, रा. कलबुर्गी कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची नोंद करण्याचे काम पोलिसांत सुरू होते.
उदगाव येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी वाहने व मोपेड या तीन वाहनांचा अपघात झाला. या श्रीशा शिंदे (मृत)
बंदेश उळागड्डे (मृत) अपघातांची मालिका सांगली-कोल्हापूर महामार्गावर गेल्या दोन महिन्यात झालेल्या अपघातात दहा ते बाराजणांना जीव गमवावा लागला आहे. उदगाव येथील अपघाताची ही दुसरी घटना आहे. महामार्गावर उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.
अपघातात श्रीशा शिंदे व बंदेश उळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरज महादेव शिदे (वय ३२, रा. जयसिंगपूर, सध्या रा. सांगली), शिवाणी सूरज शिंदे, (२३, रा. जयसिंगपूर सध्या रा. सांगली), सौरभ संजय शिंदे (२४ रा. जयसिंगपूर) हे जखमी झाले आहेत.
