इचलकरंजी / प्रतिनिधी
महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष आणि ग्रंथ दिंडी सारख्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या दिंडी मध्ये महानगरपालिकेचे सर्व पुरुष अधिकारी कर्मचारी पारंपरिक वारकरी वेशभूषेत तसेच सर्व महिला अधिकारी कर्मचारी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. वृक्ष आणि ग्रंथ दिंडी शिवतीर्थ येथून निघून महात्मा गांधी चौक राजवाडा चौक – मार्गे मंगलधाम या ठिकाणी दिंडीचा समारोप झाला. या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्देकर, पुंडलिक जाधव, मधुकर मुसळे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षकआरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, सहा. आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

