इचलकरंजी /प्रतिनिधी
पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची अत्यंत दूरवस्था झाली असून दोन्ही बाजूकडील कॉर्नर अत्यंत धोकादायक बनले आहेत. शुक्रवारी सकाळी रांगोळीकडून आलेल्या ट्रक चालकाला धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने ताबा सुटून ट्रक पुलाजवळच पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी जुन्या व नव्या पुलाच्या दोन्ही बाजूकडेला सुरक्षा निर्माण करावी, अशी मागणी होत आहे.
शुक्रवारी सकाळी रांगोळीकडून रिकामा ट्रक येत होता. चालकाचा ताबा सुटला व ट्रक रस्ता ओलांडून पुलाच्या दुसऱ्या बाजूस जाऊन खड्ड्यात पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु प्रशासनाने वेळीच या गोष्टीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.