कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात उकाडा वाढला आहे. गुरुवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस पार गेल्याने उन्हाचे चटके यसत होते. किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने सायंकाळनतंरही उकाडा जाणवत होता, ऐन थंडीत तापमानात झालेल्या वाढीमुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. कोलापुरात गेल्या दहा दिवसांत तापमानाचा आलेख चढताच आहे. तापमान ३४ अंशांपुढे गेल्याने दुपारी उन्हाचा जोरदार तडाखा बसत असल्याने नागरिकांना टोपी, स्कार्फ, स्टोलचा आधार घ्यावा लागत आहे. गुरुवारी दैनंदिन किमान तापमानात ३.५ अंशांची बाय होऊन पारा २०.१ अंशांवर, तर कमाल तापमानात २.३ अंगांची वाढ होऊन पारा ३४.३ अंशांवर पोहोचला होता, येणाऱ्या सात दिवसांत तापमानात अशीच वाव राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
