मलकापूर / प्रतिनिधी
पिशवी ता. शाहूवाडी येथील श्रीधर संजय व्हनागडे (वय १४) हा शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी परतताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. श्रीधर व्हनागडे हा इयत्ता आठवीत शिकत असून, स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी बांबवडे येथे गेला होता. परीक्षा संपल्यावर घरी जाण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधून बसून घरी जात होता. उतरण्याचे ठिकाण मागे गेल्याने घाईने चालत्या ट्रॅक्टरमधून त्याने खाली उडी घेतली असता, दप्तराची बॅग ट्रॉलीच्या हुकात अडकून तो खाली पडला. अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
