इचलकरंजी/प्रतिनिधी

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा अतिशय उत्साहात झाल्या. सर्व स्पर्धकांनी चांगल्या तयारीनिशी स्पर्धेत सहभाग घेतला. दिलेल्या सर्वच विषयांवर स्पर्श करणारे भाषण स्पर्धकांनी केले. याप्रसंगी महिलालयाच्या व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष सौ. दीप्ती मराठे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक श्री. अशोक केसरकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख
अध्यक्ष सौ. सुषमा दातार यांनी करुन दिली. परीक्षक म्हणून प्रा. उमेश हेब्बाळकर व बी. डी. हजारे यांनी केले. प्रास्ताविक कु. माया कुलकर्णी यांनी केले.
यावेळी प्रथम क्रमांक कै. वा. ग. गोगटे स्मरणार्थ – कु. वैष्णवी नितीन कोकरे (इचलकरंजी हायस्कूल, इचल.) व्दितीय क्रमांक कु. केतकी कुलकर्णी (व्यंकटराव हाय.) तृतीय क्रं. रिया कारदगे (नरंदे हाय.)
याप्रसंगी संस्थेचे संचालक काशिनाथ जगदाळे, प्रा. मोहन पुजारी, माजी संचालक दीपक होगाडे तसेच मार्गदर्शक, शिक्षक, पालक व आपटे वाचन मंदिर बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते .
