उन्हाचा तडाखा वाढला; पारा ३८ अंशांवर

कोल्हापूर / प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. सोमवारी शहरात पारा ३८ अंशांवर गेला होता. सकाळपासून उष्मा वाढला होता. दुपारी तर अंगाची लाही लाही करणारे ऊन जाणवत होते. दुपारी एक ते तीन या वेळेत तर रस्त्यावर गरम वाफा जाणवत होत्या. सायंकाळनंतरही हवेत उष्मा असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभरात ३८.३ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी वातावरण कोरडे राहण्याचा आणि पारा ३७ ते ३८ अंशादरम्यान राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Scroll to Top