कापशी/ प्रतिनिधी
परिवर्तन सामाजिक संस्थेचे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. प्रज्ञाशोध सराव परिक्षेच्या निमित्ताने शिक्षण विभागाला संस्थेचे चांगले योगदान लाभले आहे. यापुढेही या संस्थेचे सहकार्य व मार्गदर्शन याचा उपयोग तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी होईल, असे प्रतिपादन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी केले.
अर्जुनवाडा (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत परिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित प्रज्ञाशोध सराव
प्रज्ञाशोध सराव परीक्षा प्रश्नपत्रिकांचे प्रकाशन करताना हभप सचिन पवार, सौ. सारिका कासोटे व इतर मान्यवर.
चाचणीच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी परिवर्तनचे मुख्य प्रवर्तक हभप सचिन पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कागल तालुक्यातील चौथी व सातवीच्या एकूण ४३०० विद्यार्थ्यांनी एकूण २२ केंद्रावर ही परीक्षा दिली. यासाठीचे सर्व आयोजन कागल पंचायत समिती शिक्षण विभागाने केले होते. यावेळी हभप सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सराव चाचणी प्रश्नपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, केंद्रप्रमुख सदानंद पाटील, मुख्या. सावंता देवडकर, जी.एस. पाटील, अरविंद किल्लेदार आदी उपस्थित होते.
