नृसिंहवाडी / प्रतिनिधी
नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कराटे आणि कोबूडो स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील दहा खेळाडूंनी यश मिळविले. यशस्वी खेळाडूंचे येथील बन भागात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिरात खेळाडूंचा सत्कार झाला.
नवी दिल्ली येथे एमजीएफआयतर्फे राष्ट्रीय कराटे आणि कोबुडो चॅम्पियन्सशीप स्पर्धा झाली. यात शिरोळ तालुक्यातील के. के.एस.ए अकॅडमीच्या खेळाडूंनी यश मिळविले. त्यात महाराष्ट्राला सात सुवर्ण आणि सहा कांस्यपदके मिळाली. कोबूडो स्पर्धत वेदांत पाटील, हरेश माने, वरद कांबळे, अथर्व पाटील, मैत्रेयी पुजारी, अमृता सुतार, अवधूत सुतार यांना सुवर्ण तर श्रीधर चिकलगे, अमेय कुंभार, गागी चंद्रस यांना कांस्यपदक मिळाले.
कराटे स्पर्धेत वेदांत पाटील यांला सुवर्ण पदक मिळाले. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक यासीन झांबरे, अवधूत सुतार, अमय कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले.

