जयसिंगपूर / प्रतिनिधी
उदगाव (ता. शिरोळ) येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये पाच दिवशीय प्रशिक्षण झाले.या प्रशिक्षणासाठी शिरोळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतून १५४ हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. काळानुसार होणारा शिक्षण पद्धतीतील बदल शिक्षकांनी समजावून घेणे हा प्रशिक्षणाचा उद्देश होता.
विद्यार्थ्यांचा विकास हा ३६० डिग्रीत व्हायला पाहिजे, हाच या नवीन शिक्षण प्रणालीचा उद्देश आहे. यावेळी गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर डी. एल. कामत, नारायण पाटील, अनिल ओमासे, केंद्रप्रमुख अण्णा मुंडे, अपर्णा मोकाशी, अनिल पवार, बरगाले, नितीन कांबळे यांचे सहकार्य लाभले.
