वृत्तपत्र विक्रेत्यास मारहाण करणाऱ्या पोलिसपाटलावर कारवाई करा

कोनवडे (ता. भुदरगड) येथील वृत्तपत्र विक्रेते तानाजी शामराव चव्हाण यांना मारहाण करणारा पोलिसपाटील विश्वास बाबुराव पाटील याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशनने दिला आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदन देणार असल्याची माहिती गुरुवारी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत देण्यात आली. वाचकांना समजण्यासाठी मोटारसायकलचा हॉर्न वाजवल्याने वृत्तपत्र विक्रेते तानाजी चव्हाण यांना पाटील याने मारहाण केली होती. अशा पद्धतीने मारहाण करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच हल्ला असल्याचे सांगत बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मारहाण करणारा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोपही पत्रकात केला आहे. बैठकीला रघुनाथ कांबळे, शंकर चेचर, किरण व्हणगुत्ते, परशुराम सावंत, सुरेंद्र चौगले, सुरेश ब्रम्हपुरे, महेश घोडके, रवी लाड, इंद्रजित पोवार, अंकुश परब, राजाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top