टाकवडे/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड बुद्धिमत्ता आणि जिद्द दडलेली असते, हे सिद्ध केले आहे टाकवडे (ता. शिरोळ) येथील कुमार विद्या मंदिर या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीतील शौर्य सरदार कळसापनावर याने प्रज्ञाशोध परीक्षेत १८२ गुणांची कमाई करत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून दुबई शैक्षणिक दौऱ्याचा मानकरी ठरला आहे.
शौर्य इयत्ता पहिलीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश संपादन करत आहे. मात्र, चालू शैक्षणिक वर्ष (२०२४-२५) हे त्याच्यासाठी विशेष ठरले, कारण यावर्षी त्याने राज्य व जिल्हा पातळीवरील अनेक परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले आहे. शौर्यची उल्लेखनीय कामगिरी : टॅलेंट सर्च परीक्षा जिल्ह्यात तृतीय, दुबई टूरसाठी निवड, प्रज्ञाशोध निवड परीक्षा (जि. प.) तालुक्यात प्रथम, समृद्धी परीक्षा राज्यात प्रथम, भारत टॅलेंट सर्च परीक्षा जिल्ह्यात प्रथम, आयटीएस परीक्षा राज्यात तृतीय, मंथन सामान्यज्ञान परीक्षा जिल्ह्यात तृतीय, आचार्य टॅलेंट सर्च परीक्षा तालुक्यात प्रथम, शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रात प्रथम, परीक्षा ब्राँझ मेडल, रायझर्स ट्रॅक फाउंडेशन परीक्षा तालुक्यात तृतीय, शौर्य आपल्या यशाचे श्रेय कुमार विद्या मंदिर, टाकवडे या शाळेला आणि तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला देतो. त्याचे पालक श्री. सरदार व सौ. भाग्यश्री कळसापनावर, वर्गशिक्षिका सौ. अर्पणा परीट, मुख्याध्यापक कदम, तसेच प्रकाश खोत, अर्चना परीट, तुषार घाडगे, श्री. नाईक, मायाप्पा कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

