इचलकरंजी / प्रतिनिधी
भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन येथील काँग्रेस कमिटी येथे आज सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.
कारंडे यांना आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटना यांचा पाठींबा वाढत आहे. त्याचबरोबर महिला वर्गातून कारंडे यांच्या उमेदवारी बाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांशी संवाद साधण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे काँग्रेस कमिटी येथे येणार आहेत. यावेळी त्या उपस्थित महिलांना संबोधित करून महाविकास आघाडीशी महिलांविषयी धोरणे, महिलांच्या प्रगती विषयी असणारे महाविकास आघाडीचे व्हिजन याबाबत चर्चा करणार आहेत.