रुईत एकाची आत्महत्या

हातकणंगले /प्रतिनिधी
रुई (ता. हातकणंगले) येथील श्रावण सदाशिव बुडके ( वय वर्ष -४२,रा . दत्तनगर , गल्ली नंबर ९ , कबनूर (ता हातकणंगले ) याने आप्पासो देसाई रा. रुई यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबतची वर्दी शिवाजी दगडू जाधव (रा. कबनूर ) यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

Scroll to Top