यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश

इचलकरंजी/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

येथील डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींनी इस्लामपूर, मिरज, सांगली या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले.
इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत विद्याथ्र्यांनी बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, ऍथलेटिक्स या खेळात प्रथम क्रमांक पटकाविला. विद्यार्थीनींनी देखील बॅडमिंटन, कॅरम, ऍथलेटिक्स खेळात प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन केला. या सर्व विजेत्या खेळाडूंची पंढरपूर, नांदेड, जुन्नर, पुणे, आंबेजोगाई या ठिकाणी होणाऱ्या आंतर विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डीकेटीई सोसायटीचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आबाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.ए.पी. कोथळी, उपप्राचार्य प्रा.बी.ए.टारे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थीनींना प्रा.ए.एम. शेळके, प्रा. एस. बी. केटकाळे, ए. व्ही. कांबळे व एम.पी. सुतार, एल.पी. कलागते व ए.ए. मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top