प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उर्दू विद्यामंदिरचे यश

कबनूर / प्रतिनिधी

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा जिल्हा स्तरावर मराठी व उर्दू माध्यमांसाठी आयोजित करण्यात येते. सदर परीक्षा ही चाळणी व निवड अशा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते शैक्षणिक वर्ष २०२४ २५ मध्ये इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये दावतनगर – कबनूर येथील उर्दू विद्यामंदिरच्या मुहम्मद अनस अल्ताफ शेख याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
उर्दू विद्यामंदिरने सलग चौथ्या वर्षी जिल्हास्तरावर यश मिळवण्याची परंपरा या वर्षीही कायम राखली. जिल्हास्तरावर सन २१-२२ मध्ये फायका रफिक पेंढारी (द्वितीय) २२-२३ मध्ये तहुरा अल्ताफ शेख हिने (प्रथम) २३२४ मध्ये असगर अली हैदरअली अन्सारी याने (द्वितीय) २४ २५ मध्ये सलग चौथ्यांदा मोहम्मद अनस अल्ताफ शेख याने (प्रथम) पटकावून शाळेचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांना मोहम्मद आसिफ अस्मतपाशा बाग सिराज, परवीन आसिफ खतीब, अल्ताफ मौला शेख यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक खालील अहमद मैनुद्दीन पटेल, जिल्हा उर्दू विस्ताराधिकारी मुसा सुतार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले यांचे प्रोत्साहन मिळाले. विस्तार अधिकारी जे. टी पाटील, बिरंगे यांनी तालुका कोअर कमिटी मार्फत केलेले सराव परीक्षेचे नियोजन अतिशय मोलाचे ठरले.

Scroll to Top