कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी १० वी व १२ वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणांचे अर्ज मआपले सरकारफ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांनी केले आहे. यापूर्वी हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात होते, त्यात यावर्षीपासून बदल करण्यात आला आहे.
मानवी चुकांमुळे ग्रेस गुण प्रक्रियाचे काम अचूक व दोषरहित होणे क्लिष्ट होत होते, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता, त्यावर ही सर्व प्रक्रिया निर्दोष व्हावी याकरिता यावर्षीपासून ग्रेस गुणांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारेच करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यामुळे यावर्षी कोणत्याही प्रकारचे लिखित, ऑफलाईन पद्धतीने असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ते कोणीही जिल्हा क्रीडा कार्यालय, राज्य परीक्षा प्रमाणपत्र मंडळात आणून देऊ नये, हे सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावे, असेही आडसूळ यांनी स्पष्ट केले आहे.
