राज्य क्रिकेट संघात अर्णव पाटील

कुरुंदवाड /प्रतिनिधी

सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील अर्णव विक्रांत पाटील याची चौदा वर्षाखालील राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. अर्णव शिक्षणासाठी पुणे येथे असून तो सिटी इंटरनॅशनल स्कूल व पुनीत बालन, केदार जाधव (पुणे) या अकॅडमीचा विद्यार्थी आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या वतीने घेतलेल्या निवड चाचणीत अर्णवची निवड झाली आहे. चौदा वर्षांखालील संघासोबत देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंशी खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याला प्रशिक्षक सूरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top