कोल्हापूर / प्रतिनिधी
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार व कन्सल्टंट कंपनीला दिल्या. पुनर्बाधणी कामाची प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पाहणी करून दुसऱ्या टप्प्यातील काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार व्ही. के. पाटील यांना दिल्या.
तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यानिविदेची मुदत संपल्याने आलेल्या निवेदेची तांत्रिक छाननी पूर्ण करून ठेकेदार निश्चित करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. तसेच तालीम संघाची व दुकान गाळ्यांची ताब्यात आलेल्या जागेवर डीपीआर व एस्टिमेट तातडीने तयार करून प्रस्तावित करण्याच्या सूचनाही शहर अभियंता यांना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, ठेकेदार व्ही. के. पाटील उपस्थित होते.

