तात्काळ क्षारपड जमिन सुधारणेची कामे सुरु करा – आमदार यड्रावकर

जयसिंगपूर / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिन सुधारणेच्या कामाला तात्काळ गती द्या, पायलट प्रोजेक्ट पूर्ण करा, १ इंचही जमिन सुधारणेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा कठोर सूचना आणि मोठे निर्देश आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सोमवारी सरकारी अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत दिल्या आहेत.

आम. डॉ. यड्रावकर म्हणाले, उदगाव, दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालये, शशिकला क्षयरोग रुग्णालयाची संरक्षण भिंत, जयसिंगपूर सर्किट हाऊस, बस्तवाड, मजरेवाडी व उदगाव रेल्वे स्टेशन पूल, पाणंद रस्ते, जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा परिसर, रेल्वे उड्डाणपूल, सामाजिक सभागृह, अंडरग्राऊंड गटर, पाणी पुरवठा प्रकल्प व कुरुंदवाड आणि शिरोळ येथील महत्वाचे सर्व प्रकल्प, शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अंतर्गत रस्ते, सामाजिक सभागृहे, झोपडपट्टी नियमितीकरण ही कामे तात्काळ सुरु झाली पाहिजेत, काही अडचणी असल्यास मला सांगावे, पण, माझ्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशा कठोर सूचना त्यांनी केल्या. यावेळी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, पाणी पुरवठा, वेगवेगळ्या विभागांचे अभियंता, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाडचे मुख्याधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी तसेच वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top