जयसिंगपूर / प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, या जयघोषात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या पालखीला शनिवारी सायंकाळी ५ वा. मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. डॉ. अशोकराव माने, दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, जि. प.चे माजी सभापती अनिल ऊर्फ सावकर मादनाईक, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सिद्धराज देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर यांच्यासह जयसिंगपूर शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखीचे पूजन वीरेंद्रसिंह निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धराज देवालयचे ट्रस्टी राजेंद्र दाइंगडे, यात्रा कमिटी व हमाल संघटनेचे अध्यक्ष संभाजी मोरे अॅड. गजानन आंबेकर, राजेंद्र शहापुरे, संजय कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलगुटगी, बजरंग खामकर, पराग पाटील आदी उपस्थित होते.

