बांबवडे / प्रतिनिधी
वारणा कापशी येथील श्रीकांत कदम यांनी परिश्रमाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. सहा महिन्यांत तब्बल तीन स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले.
सांगली जिल्हा परिषद येथे आरोग्य सेवक, मंत्रालय सहायक, कर सहायक या पदांसाठी निवड झाली आहे. भाऊ बाबासाहेब कदम, संदीप कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले. ग्रा.पं. तर्फे कदम यांचा सत्कार करण्यात आला.
