इचलकरंजी/प्रतिनिधी
येथील गद्रे दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव सोहळा सुरु झाला आहे. या उत्सवात कथाकार श्री रामनाथचुवा गमचंद्र अय्यर (पुणे) यांचा संगीतमय शित्रपुरक्षण कथा आयोजित केली आहे. या मध्ये दररोज क्रमवार शिवपुराण महिमा, ब्रह्मा, विष्णु उत्पत्ती, मच्छिंद्रनाथ गोरखनाथ, मार्कंडेय चरित्र, श्रीयाळ चांगुणा चरीत्र, नटराज कथा, शिवपार्वती स्वयंवर, रामेश्वर लिंग स्थापना अशा अनेक विषयांवरील कथापुरान संपन्न होणार आहे. शनिवार ता. १४ रोजी श्री दत्त जयंती सोहळा तसेच सोमवार ता. १६ रोजी महाप्रसाद व सोमवार रात्री रोहित पुजारी यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रन संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भन्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गद्रे दत्त देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.