शिवतेज विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

आळते/प्रतिनिधी


आळते ता. हातकणंगले येथील शिवतेज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. किडा महोत्सवाचे उद्घाटन हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मेमाने म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी सुसज क्रीडांगण असणे ही आज गरज आहे. या विद्यालयातील सुसज्ज क्रिडांगणामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडत असून त्यातूनच एक सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडतो.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत लहान मुलांसाठी तीन पायाची शर्यत, पोत्यात पाय घालून पळणे, लिंबू चमचा व मोठ्या वर्गातील मुलांसाठी कबड्डी, खो-खो, थाळी फेक, गोळा फेक, रनिंग यांसारखे खेळ घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रथम दिवशी क्रीडा शपथ देण्यात आली त्यावेळी संस्थेचे चेअरमन संजय दीक्षित, उपमुख्याध्यापिका प्रियांका पाटील, कमरूद्दीन मुजावर, सतिश गावडे यांच्यासह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Scroll to Top