चोकाक/ प्रतिनिधी

येथे भरवण्यात आलेल्या चोकाक प्रेमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलर वाईब्जने विजेतेपद मिळविले त्यांनी अंतिम सामन्यात पाटील किराणा स्टोअरचा पराभव केला. सोलर वाईब्जने प्रथम फलंदाजी करताना सहा षटकांत ७१ धावांचा डोंगर रचला यामध्ये ओपनर प्रतीक सदलगे याने ३६ धावा जमवल्या. सामन्याच्या निर्णायक क्षणी सोलर वाईब्जच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत पाटील किराणा स्टोअरचा रथ ३६ धावांवरच रोखला.
पहिल्या पर्वाला के के म्युजिक प्रो कुणाल कांबळे, स्वामी समर्थ केबल नेटवर्क प्रो सचिन कुंभार, गोल्डन इरा फिटनेस प्रो प्रतीक पाटील, साथीदार मेन्स वेअर प्रो ओमकार ननवरे, स्वामी समर्थ मंडप प्रो सुरज सुतार आणि रेणुका लाईटस प्रो राहुल निर्वाने या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच एस एम स्पोर्ट्स च्या खेळाडूंनी देखील प्रभावशाली खेळाचे प्रदर्शन केले प्रथम क्रमांकाचे चषक युवा नेते अभय बनगे यांच्या हस्ते, द्वितीय क्रमांकचे सरपंच सुनील चोकाककर यांच्या हस्ते, तृतीय क्रमांकाचे जलद पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
अनुक्रमे १,२,३, क्रमांकाचे चषक ग्रामपंचायत सदस्य प्रसाद भोपळे यांचेकडून देण्यात आले फायनल चशक ग्रामपंचायत सदस्य सविता हलसवडे यांचेकडून देण्यात आला.
