श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून विविध उपक्रमांमधून समाजप्रबोधन : चंद्रकांत मोरे

इचलकरंजी / प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अध्यात्माची नवी दिशा आणि समाजाला आधार देणारा सेवाभाव हेच या चळवळीचे खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) चे चंद्रकांतदादा मोरे यांनी केले.
अध्यात्मिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा मोरे हे इचलकरंजी सेवा केंद्रामध्ये आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून देशभर अध्यात्मिक क्रांती घडविण्याचे कार्य वेगाने सुरू असल्याने नमुद करत या मार्गातून केवळ भक्तीभाव नव्हे तर समाजोपयोगी कार्यांनाही विशेष प्राधान्य दिले जाते. विशेषतः महिलांना अध्यात्मिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी दिली जात असून विविध पूजन, नामस्मरण, ध्यानधारणा, साधना वर्ग तसेच आध्यत्मिक सेवांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. या सेवा मार्गामार्फत सामाजिक उपक्रमांनाही चालना मिळते. व्यसनमुक्ती अभियान, बालसंस्कार शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, अन्नदान सेवा आयुर्वेद,वास्तुशास्त्र,स्वयंरोजगार,हस्तशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भारतीय अस्मिता अशा विविध उपक्रमांमधून समाजप्रबोधन व सेवाभाव जागविला जातो.
संपूर्ण देशभरात आणि परदेशात आठ हजारहून अधिक केंद्रात १५ कोटी सेवेकरी या सेवा मार्गाशी जोडले गेले असल्याचे सांगितले. नदीवेस येथील सेवा केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी इचलकरंजी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच हजारो भाविक, सेवेकरी उपस्थित होते.

Scroll to Top