सहा वर्षांच्या बालकास सर्पदंश

कोल्हापूर/ प्रतिनिधी

सहा वर्षाच्या बालकास सर्पदंश झाल्यामुळे त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिरोली पुलाची येथे हा प्रकार घडला. नातेवाइकांनी त्यास तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. वरद सचिन पाटील (वय ६) असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Scroll to Top