हातकणंगलेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी आयोजन

हातकणंगले / प्रतिनिधी

येथे धर्म, भक्ती आणि संस्कृतीचा अखंड जागर करणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. नृसिंह जयंती ते चोखा मेळा पुण्यतिथी या पावन काळात दि. ११ ते १८ मे दरम्यान पार पडणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्ताने संता परंपरेचा सुवर्णवारसा जपणाऱ्या जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज, संता नामदेव महाराज, संत एकनाथ महाराजा व संत कबीरदास महाराज यांच्या वंशजांची कीर्तन सेवा हे सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. घरातील प्रत्येकी किमान एका व्यक्तीने ज्ञानेश्वरी वाचनात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. १५ मे सायंकाळी ५ ते ७दरम्यान ‘औषधा विना आरोग्य’ या विषयावर स्वागत तोडकर यांचे व्याख्यान, १६ मे रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रम, १७ मे रोजी भव्या पालखी व रिंगण सोहळा, तर १८ मे रोजी महाप्रसादचे वाटप होणार आहे.

Scroll to Top